Love, sex & Dhoka

Give Review

लेखाचे नाव वाचूनच डोळे विस्फारले गेले ना। कारण आजच्या ऑनलाइनच्या जमान्यात तरुण पिढी याच विळख्यात अडकली गेली आहे. प्रेम, शरीरसुख या नैसर्गिक भावना आहेत, पण जेव्हा त्या गोष्टींचा अतिरेक होतो. तेव्हा मात्र आयुष्य पणाला लागतं.

आज आपण या लेखां मध्ये बघणार आहोत जातकाचे असे काय ग्रहमान असतात कि त्यामुळे प्रेमा सारखी सुरेख भावना विकृती मध्ये बदलते. आज जर आपल्याला मुला-मुलींच्या पत्रिके अधिच असे काही ग्रहमान आहे असे कळेल तर कदाचित पुढे होणारे नुकसान आपण टाळू शकतो. मला बरेच जातक विचारतात कि मॅडम खरंच डेस्टिनी बदलता येते का? माझे उत्तर आहे हो येते. कारण तुमच्या मागील जन्माच्या कर्मा नुसार तुम्हाला या जन्मात काय भोगायला लागणार आहे. याची बॅलन्स शीट असते. आपण आपल्या उपासनेने किंवा विचारांच्या लहरींनी आपण आपले डेस्टिनी बदलू शकतो.

आता आपण आपल्या मुख्य विषया कडे वळू… प्रेमाचे कारक ग्रह शुक्र आणि आकर्षणाचा मुख्य ग्रह मंगळ आहे. तसेच पंचमस्थान व सप्तम स्थान, अष्टम स्थान, व्यय स्थान ही स्थाने आणि शुक्र व मंगळाचा योग बघणे आवश्यक आहे. मंगळाच्या राशीतला शुक्र हा शुक्राच्या प्रेमाच्या गुणाला हवा देतो. मंगळा सारख्या अग्नी तत्वाचा, पराक्रमी ग्रह जेव्हा शुक्राच्या योगात येतो तेव्हा शुक्राच्या हळुवार प्रेमाला वासनेची झालर लागते.

शुक्र हा प्रणयी, विलसी व निसर्गतः काम प्रधान ग्रह असून मंगळ हा जबरदस्त शक्ती असलेला काम प्रधान पुरुष ग्रह आहे. त्यामुळे जेव्हा शुक्र मंगळ या दोन ग्रहांच्या कोणत्याही योगात विलासीपणा, कामुकता, योगी कृतीचा भाग जास्तच असतो.

जर शुक्रमंगळ युती पुरुषाच्या पत्रिकेत असेल तर असे पुरुष स्त्री वश असतात. ” स्त्री दाक्षिण्य ” हा प्रकार मोठ्या प्रमाणात त्यांच्यात भरलेला असतो.

सर्वसाधारणपणे पुरुषांच्या पत्रिकेत १, ४, ८, १२, २, ७ या राशीत ही युति कामुक्ता, प्रणय हया दृष्टीने जास्त प्रबळ ठरते. ही युती तरुण वयात एखादे तरी प्रेम प्रकरण घडवतेच अशातच हा योग जर राहु, हर्षल व या सारख्या कुयोगात असतील तर अनौतिक संबंध दाखवतो.

हा योग हाव वाढणारा योग आहे. अशा व्यक्तींच्या अपेक्षा जास्त असतात, अपेक्षाभंगाचे दुःख मग पदरी येते.

शुक्र नेपच्यून योग प्रेमामध्ये उत्कंठता दाखवतो, भावनिक प्रेम दाखवते. पण ह्या योगात जर मंगळ हर्षलशी कुयोग झाला तर प्रेम भंगाचे प्रसंग येतात व आयुष्यात धोका अनुभवावा लागतो.

शुक्र, हर्षल अशुभ योग असुन शुक्र, नेपच्यून किंवा मंगळ, शनिने बिघडला असता व्यक्तिचे चारित्र्य खराब होते आणि समोरच्याची फसगत होते. शुक्र नेपच्यून अशुभ योगात वैचारिक संघर्ष काही काळ मोठा गैरसमज, केंद्र व प्रतियोगात एखादा ग्रह वक्री असता नाट्यमय घटना घडते. अशा योगात व्यक्तीला भावनांच्या संघर्षाचे मोठे दुःख आयुष्यात होते / झेलावे लागते. सफल स्थान बिघडले असल्यास जीवनात मृग जळाच्या मागे लागल्या सारखी भुरळ पडते.

आयुष्याच्या महत्वाच्या वयात जर आपल्याला योग्य ते मार्गदर्शन ग्रहांच्या माध्यमातून मिळाले तर वेळीच आपण खूप मोठ्या दुर्घटनेतून वाचू शकतो. एवढे बोलून मी माझे मनोगत संपवते.

नमस्कार!

                                                                                                                                                                                   शितल बडकस.

                                                                                                                                                  Email-astroindiaguru1031@gmail.com   

                                                                                                                                                                  

शितल बडकस

 के. पी. ज्योतिष पंडित, टॅरोट कार्ड रीडर, नुमरोलॉजिस्ट, रेकीमास्टर, PLR थेरपिस्ट


MEDITATION

                                                                    

नमस्कार मित्रांनो

आज मी मला समजलेले “ध्यान” (MEDITATION) आपल्या बरोबर शेअर करणार आहे. कसे असते “ध्यान” (MEDITATION) आणि कसे व का करावे “ध्यान” (MEDITATION)?

सोप्या भाषेत सांगायचे झाले तर…. एखाद्याचे जर लक्ष नसेल तर आपण नेहमीच्या जीवनात सहज बोलतो कुठे तंद्री लागली? मग जेव्हा ही तंद्री लागते तेव्हा आपल्याला आजूबाजूचे ध्यान असते का? आजूबाजूला काय चाललंय हे समजतं का? तर नाही… मग जे आपण “ध्यान” (MEDITATION) करा म्हणतो ते काय या तंद्री पेक्षा वेगळे असते? जेव्हा आपल्याला तंद्री लागते त्यावेळी आपण पूर्ण पणे शून्यात जातो आजूबाजूला काय चाललंय याचे भान नसते.

मग हे ध्यान नसेल का? कारण “ध्यान” करणं म्हणजेच मनाला आवर घालून एखाद्या विशिष्ट (श्वास, इष्ट देवता, निसर्ग सौंदर्य) गोष्टींमध्ये आपले लक्ष केंद्रित करणे व मनाचा ताण कमी करणे. मुख्य म्हणजे मनाला व मेंदूला आराम देणे. आपले मन म्हणजे जणू पक्षीच, आता इथे तर दुसऱ्या क्षणी भलतीकडे गेलेले. भौतिक सुख कुरवाळत बसलेले किंवा भूतकाळ कुरवाळत रमलेले हे आपण जाणतो. तेच तेच चिंतन करून शेवटी मानसिक ताण वाढवणे, परिणामी थकवा, त्रस्त पणा, चिंता आणि त्यातून उत्पन्न होतात नकारात्मक विचार व आपले स्वास्थ्य बिघडून आजाराना सामोरे जावे लागते. यातून आपली सुटका करायची तर ध्यान (MEDITATION) हे उत्तम  साधन आहे.

तुमच्यासोबत असे कधी झालयं, की तीव्रपणे एखाद्याची आठवण काढावी आणि तो समोर प्रत्यक्ष हजर… किंवा बोलता बोलता एखादी कल्पना डोक्यात यावी, आणि न सांगताच ती अगदी तशीच्या तशी समोरच्याला एकदम सुचावी..कधी नुसताचं एखाद्या गोष्टीचा सतत विचार करावा आणि कालांतराने अशक्य वाटणारी ती घटना प्रत्यक्षात यावी, मग राहुन राहुन त्याबद्दल आश्चर्य वाटतं.

असं का होतं माहितीय.

आपलं डोकं एका रेडिओ सारखं आहे, ते नेहमी संदेशांचं आणि सिग्नलचं आदानप्रदान करत असतं, म्हणुन कधी आपलं मन एकदम आनंदी, प्रफुल्ल्लीत असतं, तरी कधी चिडचिड व्हायला लागते, आणि आपण उदास होतो. जर तुम्हाला नेहमीच आनंदी राहावं असं वाटत असेल तर हे वाचाच.

मनाचे दोन भाग आहेत, चेतन मन (जागं असलेलं मन) आणि अवचेतन मन (सुप्त मन). तसचं प्रत्येक मानवी मनाच्या चार अवस्था, म्हणजे चार फ्रिक्वेन्सी आहेत.

बीटा अवस्था – हे आहे आपले चेतन मन, म्हणजे आपली सकाळी उठल्यापासुन रात्री झोपण्यापर्यंत ची जागृत अवस्था. ह्याची फ्रिक्वेन्सी आहे – १४ ते ३० हर्ट्झ.

अल्फा स्टेट – ह्यात चेतन मन आणि अवचेतन मन दोघेही झोपलेले असतात. ह्याला ध्यान अवस्था किंवा मेडिटेशन स्टेट असेही म्हणतात. फ्रिक्वेन्सी – ७ ते १३ हर्ट्झ.

थीटा अवस्था – आपली झोपेची स्थिती, चेतन मन झोपलेले, अवचेतन मनाचे खेळ सुरुच.. फ्रिक्वेन्सी – ३.५ ते ७ हर्ट्झ.

डेल्टा अवस्था – गाढ निद्रेची स्थिती. फ्रिक्वेन्सी – ०.५ ते ३.५ हर्ट्झ.

फक्त माणुसच नाही तर ह्या ब्रम्हांडातील प्रत्येक गोष्ट एक फ्रिक्वेन्सी सोडते. आपल्या आजुबाजुला वातावरणाचा एक थर आहे, त्याला म्हणतात आयनमंडल. विचारांचे आदानप्रदान करणारं हे माध्यम आहे. याची फ्रिक्वेन्सी आहे ६.८ हझ.

आता वरच्या सर्व फ्रिक्वेन्सीचे आकडे पडताळुन पहा. वातावरणाची आणि मनाच्या अल्फा स्टेटची फ्रिक्वेन्सी एकच आहे.

म्हणजे जर आपण आपल्या मनाला अल्फा स्टेटला नेलं, तर वातावरणच्या माध्यमाचा वापर करुन आपण आपल्याला हवं ते घडवु शकतो.अल्फा स्टेट म्हणजेच ध्यानाची अवस्था…

प्रत्येकानं जितकं आपलं वय आहे तितकी मिनीटे रोज ध्यान करायलाचं हवं, काही क्षणासाठी तरी मन चंचल आहे, पण रोजच्या सरावाने ते हळुहळु शांत-शांत व्हायला लागतं. मग एका वेगळ्याच आनंदाची अनुभुती यायला लागते. ध्यान संपवताना ज्या गोष्टी आपल्याला हव्या आहेत त्यावर लक्ष्य केंद्रित करायचं, म्हणजे त्या आपल्याला ऑलरेडी मिळालेल्या आहेत असं फिल करायचं.

आयुष्यात घडणाऱ्या चांगल्या गोष्टींबद्दल देवाला मनापासुन ‘ थँक यु ‘ म्हणायचं. आणि बस! निर्धास्त रहा, विश्वास ठेवा!…

आता ब्रह्मांड तुमच्या स्वप्नातल्या साऱ्या गोष्टी तुम्हाला मिळवुन देण्यासाठी आकाशपाताळ एक करेल.

अशा ध्यानाचा इफेक्ट म्हणजे याने स्मरणशक्ती प्रचंड वाढते. मन चिंतामुक्त होतं.

कामाचा आवाका वाढतो, आत्मविश्वास वाढतो. काम करण्यात आनंद मिळतो, मोठीमोठी इतरांना अवघड वाटणारी कामं आपल्याकडुन चुटकीसरशी होतात.

                                                                                                                                                             शितल बडकस.

                                                                                                                               Email – astroindiaguru1031@gmail.com